८०९ पैकी केवळ ३७९ सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
By Admin | Updated: April 29, 2015 23:46 IST2015-04-29T23:45:38+5:302015-04-29T23:46:02+5:30
८०९ पैकी केवळ ३७९ सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी

८०९ पैकी केवळ ३७९ सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
नाशिक : नाशिक जिल्ह्णातील ८०९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, केवळ ३७९ ग्रामपंचायतीच खुल्या प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव झाले आहे.
नाशिक जिल्ह्णात ११ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी ६६, अनुसूचित जातीतील महिलांसाठी ३३, अनुसूचित जातीच्या खुल्या प्रवर्गासाठी (पुरुष किंवा महिला दोन्ही अर्ज दाखल करू शकतात) १४५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ७६ सरपंचपद आरक्षित आहेत. नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी २९९, तर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी ११२ याप्रमाणे पदे आरक्षित आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी ३७९, तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी १९६ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.