तलावारीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

By Admin | Updated: July 6, 2016 16:42 IST2016-07-06T16:42:07+5:302016-07-06T16:42:07+5:30

जमिन बळकावण्याच्या इराद्याने पतीला मद्य पाजुन पत्नीवर सात जणांनी अत्याचार केल्याची फिर्याद येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथील विवाहीत महिलेने दिली आहे.

Torture threatening woman | तलावारीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

तलावारीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक) - जमिन बळकावण्याच्या इराद्याने पतीला मद्य पाजुन पत्नीवर सात जणांनी अत्याचार केल्याची फिर्याद येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथील विवाहीत महिलेने दिली आहे. येवला तालुका पोलीस स्टेशन येथे या महिलेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०१६ व २५ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री पन्हाळसाठे येथे महिलेच्या राहत्या घरी सरपंच सुरेश भागवत बोडके, गणेश विठ्ठल ढाकणे, राजेश प्रविण पटेल, प्रविण महादेव ढाकणे, अनिल माधव ढाकणे, देविदास भागवत बोडके, माणकि रमाजी वाघ ह्यांनी संगनताने पिडीत महिलेच्या पतीस मद्य पाजुन महिलेला तलवारीचा धाक दाखिवत जमीन बळकावण्यासाठी महिलेवर ब्अत्याचार व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत  म्हटले आहे.  
याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाणे येथे संबंधीत आठही संशयितआरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रु पचंद वाघमारे करीत आहे.

Web Title: Torture threatening woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.