मामाचा चिमुरडीवर अत्याचार
By Admin | Updated: February 2, 2017 02:05 IST2017-02-02T02:05:39+5:302017-02-02T02:05:53+5:30
मामाचा चिमुरडीवर अत्याचार

मामाचा चिमुरडीवर अत्याचार
सिन्नर : येथील भैरवनाथनगर भागात राहणाऱ्या परप्रांतीय युवकाने चारवर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी संशयित मामाला अटक केली
आहे.
येथील भैरवनाथनगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे बिहार राज्यातील एक कुटुंब मजुरीचे काम करून आपली उपजीविका करतात. दोन महिन्यांपूर्वी या परप्रांतीय कुटुंबातील महिलेचा मावस भाऊ सिन्नरला रहायला आला होता. दोन दिवसांपासून तो त्याच्या मावस बहिणीकडे राहत होता. मावस बहिणीची चार वर्षांच्या मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने तिला बाहेर नेले. पाण्याच्या टाकीजवळ निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर चिमुरडी रडत होती. तिचे कपडे गवताने खराब झाले होते. आईला संशय आल्यानंतर सदर बालिकेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी सदर महिलेच्या मावस भावास परिसरात शोध घेऊन अटक केली.
सदर बालिकेची व संशयित आरोपी अमितकुमार हरेंद्र महांतो (२५, मूळ रा. सासाराम, ता. भगवानपूर, जि. शिवाल, बिहार) यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संशयित आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एन. ए. सय्यद अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)