जयंत नारळीकर यांचे उद्या व्याख्यान
By Admin | Updated: August 19, 2014 01:21 IST2014-08-19T00:44:16+5:302014-08-19T01:21:17+5:30
जयंत नारळीकर यांचे उद्या व्याख्यान

जयंत नारळीकर यांचे उद्या व्याख्यान
नाशिक : शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला उपक्रमात बुधवारी (दि.२०) प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व आजचा समाज’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला सुरू असून, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन, गोदावरी गटारीकरणविरोधी मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्वोदय परिवार व जीवनउत्सव, मराठी विज्ञान परिषद आदि संघटनांच्या वतीने दर महिन्याच्या २० तारखेला व्याख्यान आयोजित केले जाते. नाशिककरांनी व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सचिन मालेगावकर यांनी केले आहे.