टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भावं

By Admin | Updated: August 8, 2014 01:37 IST2014-08-05T21:43:00+5:302014-08-08T01:37:05+5:30

टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भावं

Tomatoes have a tendency to toothache | टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भावं

टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भावं

 

पिंपळगाव बसवंत : पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. जून महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर टमाट्याची लागवड केली. अनेकांनी तर ठिबक सिंचनाचा सहारा घेतला. चालू सप्ताहात पावसाने दमदार हजेरी लावली खरी, पण टमाट्यावर घुबडा, करपा, पांढरी माशी, दांड्यारोगाने शेतकरी हैराण झाले असून, अनेक शेतकऱ्यांना प्रभावित रोपे उपटून टाकावे लागत आहे. मागील वर्षी टमाटा उत्पादकांना पांढऱ्या माशीने हैराण केले होते. यावर्षी दांड्या रोगाने हैराण केले आहे. या रोगाने झाडाचे खोड आतून जळून जाते व झाड पूर्णपणे निकामी होते. कुठल्याही फवारणीने हा रोग आटोक्यात येत नाही. आॅगस्टअखेर टमाटा बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र पिकांवर रोगाने आक्रमण केल्यामुळे खर्चांचा ताळमेळ बसू देणार की नाही हे मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. (वार्ताहर)

Web Title: Tomatoes have a tendency to toothache