टमाटा दरात घसरण
By Admin | Updated: November 11, 2015 21:56 IST2015-11-11T21:55:58+5:302015-11-11T21:56:49+5:30
वणी : निर्यात बंदचा उत्पादकांना फटका

टमाटा दरात घसरण
वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सीमा बंद झाल्याने टमाट्याची निर्यात थांबली असून, टमाट्याची मागणी घटली आहे. परिणामी टमाट्याच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत टमाट्याला मागणी असली तरी उत्पादनाच्या तुलनेत भाव नसल्याने याचा फटका उत्पादकांना बसत आहे.
दिंडोरी तालुक्यात मध्यंतरीच्या अनैसर्गिक वातावरणामुळे टमाटाच्या पिकाची मोठी हानी झाली. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रचंड घट झाली. पर्यायाने मागणी इतका पुरवठा झाला नाही त्यामुळे टमाट्याचे दर घाऊक बाजारात ३० ते ४५ रु पये प्रतिकिलो इतके झाले होते. त्यामुळे सुरक्षित, उर्वरित टमाटा उत्पादकांना दराबाबत अनुकूलतेचे वातावरण निर्माण झाले. काही वेळा विक्रमी दराने टमाटा खरेदी करण्यात आला. त्यात पाकिस्तानमध्ये टमाट्याला मोठी मागणी वाढली. सुमारे २५० ट्रक टमाटा प्रतिदिन परदेशात जाऊ लागला होता. मात्र आता सीमा बंद असल्याने टमाट्याच्या दरावर परिणाम झाला असून, निर्यातक्षम टमाट्याला २० ते २५ दर मिळत आहे. (वार्ताहर)