टमाटे झाले जनावरांचे खाद्य

By Admin | Updated: January 9, 2017 00:32 IST2017-01-09T00:32:14+5:302017-01-09T00:32:49+5:30

शेतकऱ्यांच्या व्यथा : चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा

Tomato feeding animals | टमाटे झाले जनावरांचे खाद्य

टमाटे झाले जनावरांचे खाद्य

बेलगाव कुऱ्हे : अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या बळीराजाला आज बदलत्या काळात शेतीत घाम गाळूनदेखील उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे नेहमीच उपजीविकेसाठी त्याला वणवण भटकंती करावी लागत आहे.
पारंपरिक शेती व्यवसायात खूप अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील पारंपरिक शेती करणारे कष्टकरी शेतकरी बागाईत पिके घेऊन देखील बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील साकुर, जानोरी, भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, निनावी आदि भागातील अनेक शेतकरी भातशेतीबरोबर बागाईत शेती करतात. यंदा त्यांनी टमाटे हे पीक घेतले होते. मात्र सध्या टमाट्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने अक्षरश: पाळीव जनावरांना टमाटे खाद्य म्हणून देतात. (वार्ताहर)

Web Title: Tomato feeding animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.