शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे.

ठळक मुद्दे तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव

संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे. आॅगस्ट ते डिसेंबर असा पाच महिन्यांचा कालावधी टमाटा हंगामाचा असतो मात्र यंदा गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. इतरवेळी हंगामात एकरी किमान २०० टमाटा जाळी निघायच्या तेथे आज ५० जाळ्याच टमाटे निघाले आहेत.परतीचा पाऊस त्यातच भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने १५ आॅगस्टपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला टमाटा मालाची निर्यात बंद झाली आहे. हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून अंदाजे जवळपास १०० ट्रकभर टमाटा माल दैनंदिन पाकिस्तानला रवाना केला जायचा. मात्र आता सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला टमाट्याची निर्यात सध्या बंदच आहे. ...तर टमाट्याने शंभरी गाठली असती आॅगस्ट ते डिसेंबर हा टमाट्याचा हंगाम असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा शेतकºयांनी टमाट्याची लागवड केली खरी, परंतु ऐनवेळी परतीच्या पावसाने टमाटा पिकाला फटका बसला. पावसामुळे टमाट्याचे उभे पीक नाश पावले. त्यातच भारत-पाकिस्तान सीमारेषा तणावामुळे बंद आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद नसती तर टमाट्याला पाकिस्तानात १४०० ते १५०० रुपये प्रति जाळी बाजारभाव मिळाला असता व नाशिकमध्ये टमाट्याने किलोमागे किमान शंभरीचा बाजारभाव तरी गाठला असता.

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी