टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर आली लाली

By Admin | Updated: August 9, 2014 00:57 IST2014-08-09T00:08:28+5:302014-08-09T00:57:02+5:30

तेजी : ६०० ते ७०० रुपये प्रति जाळी भाव

Tomato blossomed in the face of growers | टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर आली लाली

टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर आली लाली

खामखेडा : सध्या टमाट्याला मिळत असलेला चांगला भावामुळे शेतकरी आनंदात असला तरी इतर पिकांना भाव नसल्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे.
परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात टमाट्याची लागवड केली जाते. चालू वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे नुकतेच टाकलेले टमाट्याचे बियाणे या गारा व पावसामुळे मातीत दाबले गेली. नंतर शेतकऱ्याने पुन्हा नव्याने टमाट्याचे बियाणे जमिनीत टाकले; परंतु गारपीट व पावसामुळे जमिनीतील क्षार कमी झाल्याने बियाणे उगवले नाही. गावातील काही शेतकऱ्यांनी खासगी रोपवाटिकातून महागडी टमाट्याची रोपे आणली.
टमाटा पिकांची लागवड केली. मध्येच पावसाने ओढ दिल्याने टमाट्याची वाढ खुंटली होती. शेतकऱ्याने महागडी औषध फवारणी करून टमाट्याचे पीक जतन केली.
टमाटे पीक हे खर्चिक पीक आहे. त्यासाठी महागडी किटकनाशके, बांबू तारा सुतळी व लाकडी खुंट लागते. साधारण फूल लागल्यानंतर शेतामध्ये शेताच्या बांधावर लाकडी खूट ठोकून शेतामध्ये बांबू उभे करून त्यावर तारा या बांधापासून त्या बांधापर्यंत टमाट्यापासून उंच काही अंतर ठेवावे लागते. नंतर सुतळीच्या साह्याने या तारांना टमाट्याला बांधून तारांना बांधावे लागते. एक एकर टमाट्याला साधारण खूट, बांबू तारा सुतळी व मजुरीचा खर्च असा साधारण १५ ते २० हजारांच्या आसपास लागतो. (वार्ताहर)

Web Title: Tomato blossomed in the face of growers