शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सर्वपक्षीयांतर्फे टोलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:37 IST

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.

ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमक : महामार्गावरील खड्ड्यांमुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सÞुमारास नांदगाव सदो येथील शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते पंढरीनाथ सुखदेव भागडे (२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने (एमएच १५ एफपी ३०४१) घरी जात असताना बोरटेंभे गावाजवळ साई कुटीरसमोर खड्ड्यात गाडीचे पुढील चाक गेल्याने ते रस्त्यात पडले. दरम्यान मागून येणारी पिकअप (एमएच ०४ जेके ६२५२) थेट त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे व संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घोटी टोल नाक्याजवळ जमून आंदोलन सुरू केले. मध्यरात्री १२ पासून वाहनधारकांकडून टोल आकारणी बंद करत टोलनाका बंद केला.सकाळी ११ वाजता टोल प्रशासनाने महामार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून पंढरीनाथ भागडे यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर टोल सुरू करण्यात आला. याप्रसंगी उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदी उपस्थित होते. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, इगतपुरी तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, संदीप किर्वे, भागीरथ मराडे, मूलचंद भगत, प्रशांत कडू, रामदास आडोळे, भोलेनाथ चव्हाण, अ‍ॅड. हनुमंत मराडे, देवीदास आडोळे, कैलास भगत, योगेश भागडे, मनीष भगत, नामदेव भागडे, शंकर भगत, दशरथ भागडे, विठ्ठल लंगडे यांच्यासह तालुक्यातील आगरी समाज सहभागी झाला होता. पंढरीनाथ भागडे अपघाती निधनामुळे नांदगाव सदो गावावर शोककळा पसरली आहे.

मुंबई - आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.- संदीप किर्वे घोटी.

येथील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपये टोल आकारणीत होते. मात्र महामार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष दिले जात नाही. सदर खड्डे न बुजवल्यास महामार्ग बंद आंदोलन करू.- प्रशांत कडू.