मोर्चासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
By Admin | Updated: September 24, 2016 23:33 IST2016-09-24T23:32:55+5:302016-09-24T23:33:38+5:30
मोर्चासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

मोर्चासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
घोटी : नाशिक येथील मराठा क्रांती मूक मार्चात सहभागी होण्यासाठी इगतपुरी तालुक्यासह लगतच्या शहापूर व अकोले तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला, पुरु ष, युवक -युवती, आबालवृद्धांसह मराठा समाजबांधव नाशिककडे रवाना झाले. सर्व वाहनांना भवगे झेंडे लावण्यात आले होते. सकाळपासूनच रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली होती. मुंबईकडून नाशिककडे जाणारी अवजड वाहने घोटी टोल नाक्यावर थांबविण्यात आली होती. यामुळे नाक्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
इगतपुरी शहरासह शहापूर, ठाणे, पालघर आदि जिल्ह्यातून मार्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल प्रशासनातर्फे टोल माफ करण्यात आला होता.
देवळ्यात दिवसभर शुकशुकाट
देवळा : नाशिक येथील मराठा क्र ांती मोर्चास देवळा शहर व परिसरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधवांसह इतर समाजबांधव सहभागी झाल्याने देवळा शहरातील सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनास देवळा तालुक्यातील इतर समाजांनी पाठिंबा दिला होता.