नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलालगत उभारण्यात आलेले शौचालय झाडाझुडपांत लपल्याने व केरकचºयांच्या विळख्यात सापडल्याने असुन अडचण नसुन खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.एक कदम स्वच्छता की और या अभियानांतर्गत नासर्डी पुलालगत नव्यानेच बांधण्यात आलेल्या या शौचालयाच्या चारही बाजुने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे उगवल्याने शौचालय लपुन गेले आहे. तसेच शौचालयाच्या आजुबाजुला व शौचालयाकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याने शौचालयात जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गावरील वाहनधारकांसाठी उभारण्यात आलेले हे नवे शौचालय अस्वच्छतेच्या गराड्यात सापडल्याने असुन अडचण नसुन खोळंबा अशी शौचालयाची परिस्थिती झाली आहे. एकीकडे स्वच्छता निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मनपा प्रशासनाकडून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात असतांना नव्यानेच बांधलेल्या या शौचालयाच्या स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाशिकला शौचालय लपले झाडाझुडपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:29 IST
एक कदम स्वच्छता की और या अभियानांतर्गत नासर्डी पुलालगत नव्यानेच बांधण्यात आलेल्या या शौचालयाच्या चारही बाजुने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे उगवल्याने शौचालय लपुन गेले
नाशिकला शौचालय लपले झाडाझुडपात
ठळक मुद्देएक कदम स्वच्छता की और ... एकीकडे सोय तर दुसरीकडे गैरसोय