मनमाड कृउबासाठी आज मतदान
By Admin | Updated: January 30, 2016 22:45 IST2016-01-30T22:25:20+5:302016-01-30T22:45:16+5:30
मनमाड कृउबासाठी आज मतदान

मनमाड कृउबासाठी आज मतदान
मनमाड : येथील कृउबा समितीच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पॅनलमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असून, रविवारी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलची सरळ लढत जिल्हा बॅँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांच्या नम्रता पॅनलशी होणार आहे. प्रकाश घुगे, सतीश पाटील, राजेंद्र पवार, व्यंकटराव अहेर या चार माजी सभापतींनी निवडणुकीत अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीला कलाटणी मिळाली आहे. या आधी या गटाने बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नसल्याने या गटाने गोगड यांच्या पॅनलला साथ दिली आहे. (वार्ताहर)