सिंहस्थाच्या ‘मंगलपर्वा’ची आज सांगता
By Admin | Updated: August 10, 2016 23:23 IST2016-08-10T23:21:29+5:302016-08-10T23:23:22+5:30
सिंहस्थाच्या ‘मंगलपर्वा’ची आज सांगता

सिंहस्थाच्या ‘मंगलपर्वा’ची आज सांगता
नाशिक : शैव आणि वैष्णव साधू समुदायाच्या मांदियाळीने निर्माण झालेल्या तेरा महिन्यांच्या मंगलपर्वाची सांगता घटिका समीप आली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी सिंह राशीतून गुरू कन्या राशीत मार्गस्थ होईल आणि तब्बल एक तपानंतर भरणाऱ्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होईल. नाशिक क्षेत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्र्यंबकक्षेत्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते सिंहस्थाची उद्घोषणा करणाऱ्या धर्मध्वजावतरणाचा सोहळा होणार आहे. यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही नगरे पुन्हा एकदा सजली आहेत. रामकुंड परिसरात धार्मिक विधी होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.