शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गांधी-नेहरूंच्या जिवावर आजचा भारत उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:17 IST

देशात जातीयवाद, धर्मवादाचा विषारी विचार आता संस्थात्मक पातळीवरही भिनवला जात आहे. भविष्यात हा विचार वाढत गेला तर देशाची वेगाने दुर्दशा होईल. गेल्या ७० वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असा प्रचारही चुकीचा आहे.

नाशिक : देशात जातीयवाद, धर्मवादाचा विषारी विचार आता संस्थात्मक पातळीवरही भिनवला जात आहे. भविष्यात हा विचार वाढत गेला तर देशाची वेगाने दुर्दशा होईल. गेल्या ७० वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असा प्रचारही चुकीचा आहे. गांधी-नेहरुंच्या जिवावर आजचा भारत उभा आहे अन्यथा या देशाचे कधीच विघटन झाले असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत बोलताना मांडले.  कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त लोकेश शेवडे यांनी कुमार केतकर यांची मुलाखत घेतली. यावेळी, पत्रकारितेपासून ते राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना केतकर यांनी सांगितले, माझ्याबद्दल अनेक आक्षेप चर्चिले जातात. मी सोनिया-राहुल गांधींचा भाट असल्याचे म्हटले जाते. मी कॉँग्रेसचीच भूमिका मांडतो. सोईनुसार भूमिका बदलतो, अशीही टीका केली जाते. परंतु, मी १८८५ पासून कॉँग्रेसची बाजू घेतो आहे.  ज्यावेळी माझा जन्मही झालेला नव्हता. कॉँग्रेसने ज्या पद्धतीने परिस्थितीचा सामना करत देशाची बांधणी केली, त्याचा विचार मी करत गेलो. गांधी-नेहरू या दोनच नेत्यांचा विचार जगात प्रभावशाली आहे. रशियात गोर्बाचेव्ह यांनी लो कशाही पुनर्रचना हा शब्द मांडला. मिश्र अर्थव्यवस्था म्हणून त्याची मांडणी नेहरुंनी आधीच केलेली होती. कॉँग्रेस हा बहुमताचा पक्ष कधीच नव्हता, परंतु तो बहुसंख्यांकांना मान्य होता. ‘मेक इन इंडिया’ची सुरुवात मनमोहन सिंगांपासूनच झाली होती. आधी ‘मेड इन इंडिया’ची दखल घ्या, मग गेल्या ७० वर्षांत काहीच झाले नाही, हे सांगा असा टोलाही केतकर यांनी मोदी सरकारचे नाव न घेता मारला. सोशल मीडियावर सुरू असलेल्या धिंगाण्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. परंतु, आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करू शकतो, हाच एकमेव उपाय असल्याचेही केतकर यांनी सांगितले. सोवियत युनियनच्या पाडावानंतर जग अधिक असुरक्षित बनल्याचे सांगत भारताला आता विश्वासार्ह मित्रच राहिला नसल्याचे केतकर यांनी स्पष्ट केले. पत्रकाराला राजकीय भूमिका असावी, पण ती लवचिक असावी. काही चुकीचे वाटत असल्यास त्यात बदल करण्याची मानसिकताही असली पाहिजे. मी कडक कम्युनिष्ट होतो. परंतु, वाचन-अनुभवातून माझ्या विचारसरणीत बदल होत गेला, असेही केतकर यांनी सांगितले. प्रारंभी कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष व आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते केतकर यांचा सत्कार करण्यात आला.राजकारण्यांनी पत्रकारितेत यावे काय?शेवडे यांनी पत्रकारांनी राजकारणात यावे काय, असा प्रश्न केतकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना केतकर म्हणाले, पत्रकार हे राजकारणीच असतात. चर्चिल हा वार्ताहर होता. नेहरू हे तर ‘नॅशनल हेराल्ड’चे संस्थापक होते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, टिळक हे पत्रकारच होते. पत्रकार हे राजकारणातच असतात, परंतु काही पत्रकार तसे दाखवत नाहीत, असे सांगत केतकर यांनी ‘राजकारण्यांनी पत्रकारितेत यावे काय’ असा उलटा सवाल शेवडे यांना विचारला. आज सनदी अधिकारी माधव गोडबोले भूमिका मांडत असतात. चिदंबरम, एम. जे. अकबर हे सातत्याने लेखन करत असतात. घटना ही नि:पक्षपाती असते. त्यावर पत्रकार जेव्हा भाष्य करतो तेव्हा त्याला भूमिका मांडावी लागते, असेही केतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक