महापालिकेची आज महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:26 IST2017-07-20T01:26:25+5:302017-07-20T01:26:36+5:30

महापालिकेची आज महासभा

Today's General Assembly of Municipal Corporation | महापालिकेची आज महासभा

महापालिकेची आज महासभा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेची महासभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होत असून, यावेळी विषय समित्यांच्या अधिकार कक्षाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीवर दोन संचालकांचीही नियुक्ती घोषित केली जाणार आहे.
मागील महासभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पावसाळी गटार योजनेवरून विरोधकांवर आरोप केले होते. मात्र, विरोधकांना खुलासा करण्याची संधी न देता महापौरांनी सभा गुंडाळल्याने विरोधकांनी गोंधळ घातला होता. गुरुवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेत विरोधकांनी सभागृहनेत्याच्या आरोपाला उत्तर देण्याची पूर्ण तयारी केली असून, त्यावर वादळी चर्चा झडण्याची शक्यता आहे. याचबरोबर विषय समित्यांचे अधिकार व कर्तव्ये यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Today's General Assembly of Municipal Corporation