कुंभमेळा छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन
By Admin | Updated: November 1, 2015 00:01 IST2015-10-31T23:59:23+5:302015-11-01T00:01:30+5:30
कुंभमेळा छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

कुंभमेळा छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन
नाशिक : नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन व हॉटेल ओवारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत वृत्तपत्र छायाचित्रकारांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात काढलेल्या छायाचित्रांचे ‘अमृतकुंभ’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
मराठी अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांच्या हस्ते १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होेणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘ओवारा’चे संचालक गिरीश पोतदार व प्रसिद्ध कॅलिग्राफर सुनील धोपावकर उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले असून, या प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.