महिला व बालकल्याण सभापतीची आज निवडणूक
By Admin | Updated: October 20, 2015 23:19 IST2015-10-20T23:18:51+5:302015-10-20T23:19:16+5:30
महिला व बालकल्याण सभापतीची आज निवडणूक

महिला व बालकल्याण सभापतीची आज निवडणूक
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि उपसभापति-पदासाठी मनसेच्या शीतल भामरे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी बुधवारी महसूल आयुक्तालयातील उपआयुक्त रावसाहेब भागडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. सभापतिपदासाठी महाआघाडीमार्फत कॉँग्रेसकडून वत्सला खैरे, तर उपसभापतिपदासाठी मनसेच्या शीतल भामरे, तसेच विरोधकांकडून शिवसेनेच्या नंदिनी जाधव यांनी सभापती-उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. समितीवर मनसे - ३, राष्ट्रवादी - २, शिवसेना - २, कॉँग्रेस - १ आणि भाजपा - १ असे पक्षीय बलाबल आहे. महाआघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची सभापतिपदासाठी, तर मनसेच्या शीतल भामरे यांची उपसभापतिपदासाठी निवड निश्चित मानली जात
आहे. (प्रतिनिधी)