शिवसेना-भाजपा युतीबाबत आज चर्चा

By Admin | Updated: January 11, 2017 01:24 IST2017-01-11T01:20:49+5:302017-01-11T01:24:17+5:30

गिरीश महाजन : शिष्टमंडळ मुंबईत पोहोचणार

Today's discussion about the Shiv Sena-BJP combine | शिवसेना-भाजपा युतीबाबत आज चर्चा

शिवसेना-भाजपा युतीबाबत आज चर्चा

पंचवटी : आगामी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीबाबत बुधवारी (दि. ११) शिष्टमंडळ प्राथमिक चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  औरंगाबाद रोडवरील भाजपा पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी महाजन यांना शिवसेना-भाजपा युतीबाबत विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. भाजपा शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक असून, नुकत्याच पक्षाच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत युती व्हायला पाहिजे त्यादृष्टीने भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत दाखल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पणनमंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार आदि शिष्टमंडळ युतीबाबत चर्चा करून राज्यभर युती व्हावी याबाबत चर्चा करणार आहेत. युतीत वाटाघाटी राहणार असून, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगून महाजन यांनी आगामी जिल्हा परिषद व राज्यातील महापालिका निवडणुकीत युती होण्याचे संकेत दिले आहेत.

Web Title: Today's discussion about the Shiv Sena-BJP combine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.