बिझनेस बॅँकेचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 23:10 IST2016-02-20T23:05:43+5:302016-02-20T23:10:21+5:30
बिझनेस बॅँकेचा आज फैसला

बिझनेस बॅँकेचा आज फैसला
नाशिकरोड : बिझनेस बॅँक संचालक मंडळाच्या १९ जागेसाठी रविवारी
(दि. २१) जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान होणार आहे.
बिझनेस बॅँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार व आदर्श पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. १९ जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत एकूण ५०३८ मतदान आहे. जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदानासाठी १३ खोल्या असून, या प्रक्रियेसाठी सहकार विभागाने १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून दोन्ही पॅनलकडून मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आले आहे. सोमवारी घंटी म्हसोबा मंदिरमागील देशपांडे मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)