पर्याय निवडण्याची आज अखेरची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST2017-07-18T01:14:03+5:302017-07-18T01:14:19+5:30
अकरावी प्रवेश : पहिल्या फेरीत ७,७७४ प्रवेश

पर्याय निवडण्याची आज अखेरची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावीत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी त्यांच्या अर्जातील शाखा व महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात फेरबदल करण्यासाठी मंगळवारी (दि. १८) अखेरची मुदत असून, पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात फेरबदल करता येणार आहे. पहिल्या फेरीत ७,१५७ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित न करता चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली असून, यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाखा आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल केले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या एकूण १४ हजार ९६५ पैकी सात हजार ७७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या अभ्यासक्र मांसाठी प्रवेश घेतला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसले तरी त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला, तर बहुतेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत तरी अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळेल, या आशेने दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करण्याची भूमिका अवलंबली आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना १८ जुलैपर्यंत महाविद्यालयाचा पसंतीक्र म व शाखा बदलण्याची संधी देण्यात आली आहे.