‘आजचा दिवस तुझा गे माय...
By Admin | Updated: March 6, 2016 23:57 IST2016-03-06T23:54:12+5:302016-03-06T23:57:39+5:30
’काव्यमंच : दीडशेवा मेळावा रंगला

‘आजचा दिवस तुझा गे माय...
नाशिक : स्त्रियांच्या वेदना, शहीद सैनिकाच्या मातेचा आक्रोश अशा नानाविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांनी ‘काव्यमंच’चा मेळावा रंगला.
कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. ‘काव्यमंच’चे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात कवयित्री निशिगंधा घाणेकर यांनी सादर केलेली
‘आजचा एक दिवस तुझा गे माय
महिला दिनाची मजा घे माय
आजच्या दिशी बघून घे खुशी’
घटकेचा मोका जगून घे कशी...’
ही ‘आठ मार्च’ शीर्षकाची कविता रसिकांची दाद घेऊन गेली. अलका कुलकर्णी यांनी ‘वेदनेला काळजात सोसतेच मी’ या कवितेद्वारे स्त्रियांच्या दु:खांवर भाष्य केले.
याशिवाय सुरेखा बोऱ्हाडे, विलास पंचभाई, सुशीला संकलेचा, वृषाली काळे, हर्षाली घुले आदि अनेक कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. विनायकदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून सुरू असलेला ‘काव्यमंच’चा हा काव्यजागर निरंतर सुरू राहावा, अशी भावनाही
यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)