धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T01:52:44+5:302014-08-03T01:57:38+5:30

धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

Today will be shifted to the Dharmashala | धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

 

नाशिक : काझीची गढी येथील रहिवाशांचे गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाडगे महाराज धर्मशाळेत खोल्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात महापौर अ‍ॅड. यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही गाडगे महाराज धर्मशाळेच्या सर्व खोल्या तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे रविवारपासून रहिवासी या धर्मशाळेत स्थलांतरित होतील.
पावसामुळे गढीचा भाग दिवसेंदिवस खचत असून, त्यामुळे येथील सुमारे ८० ते ९० कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना स्थलांतरासाठी शासकीय यंत्रणेने राजी केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतर झालेच नाही. धर्मशाळेत जागा उपलब्ध नसल्याचा दावा संबंधित विश्वस्तांनी केला. त्यामुळे स्थलांतरासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ तसेच आमदार वसंत गिते यांनी अधिकारी आणि विश्वस्तांची बैठक घेतली त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन धर्मशाळेत किती खोल्या रिकाम्या आहेत, याची माहिती घेतल्यानंतर तेथे गढीवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. धर्मशाळेखेरीज याच ठिकाणी बंद अवस्थेत असलेली महापालिकेची शाळा आणि रुग्णालय येथे देखील रहिवाशांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौर वाघ यांनी सांगितले.
दरम्यान, महापौर अ‍ॅड. वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून धर्मशाळा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्याची मागणी केली. त्यानुसार आपत्कालीन उपाययोजनेचा एक भाग म्हणून धर्मशाळेच्या खोल्या अधिग्रहीत करण्याची विनंती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today will be shifted to the Dharmashala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.