आज, सोमवारी रेल्वे धावणार उशिरा
By Admin | Updated: July 25, 2014 00:38 IST2014-07-25T00:10:40+5:302014-07-25T00:38:49+5:30
आज, सोमवारी रेल्वे धावणार उशिरा

आज, सोमवारी रेल्वे धावणार उशिरा
नाशिकरोड : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर पादचारी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने उद्या शुक्रवारी व सोमवारी काही रेल्वे उशिराने धावणार आहेत.
देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. यामुळे उद्या शुक्रवारी व सोमवारी पुलाच्या कामाकरिता मेगा ब्लॉक असल्याने काही रेल्वे उशिराने धावतील. उद्या मुंबईहून येणारी गोदान एक्स्प्रेस, गोरखपूर, हॉलिडे स्पेशल, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस या लहवित रेल्वेस्थानकावर १५ मिनिटे थांबविण्यात येणार आहेत, तर मंगला एक्स्प्रेस २० मिनिटे थांबविण्यात येईल. जनशताब्दी एक्स्प्रेस अस्वली रेल्वेस्थानकावर १५ मिनिटे थांबणार आहे. मुंबईला जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर २० मिनिटे व गीतांजली एक्स्प्रेस ३० मिनिटे थांबणार आहे.
तसेच सोमवारी मुंबईहून सुटणारी गोरखपूर एक्स्प्रेस, दरभंगा एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस या लहवित रेल्वेस्थानकावर १५ मिनिटे, तर मंगला एक्स्प्रेस २० मिनिटे थांबविण्यात येणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस अस्वली रेल्वेस्थानकावर १५ मिनिटे थांबणार आहे. मुंबईला जाणारी पुष्पक एक्स्प्रेस १० मिनिटे नाशिकरोडला व भागलपूर एलटीटी एक्स्प्रेस १० मिनिटे ओढा स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)