आज शिवजयंती
By Admin | Updated: March 25, 2016 22:47 IST2016-03-25T22:47:07+5:302016-03-25T22:47:41+5:30
चौकाचौकात होणार छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन

आज शिवजयंती
नाशिक : हिंदुत्ववादी संघटनांकडून साजरी केली जाणारी मार्च महिन्यातील शिवजयंती यंदा जास्त जोमात साजरी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना-भाजपामधील सुरू असलेला संघर्ष आणि मनसेकडून पडझड रोखून संघटन बळकट करण्यासाठी शिवजयंती जोरात साजरी करण्याची तयारी केली आहे.
राज्यातील सत्तेमुळे शिवसेनेसह भाजपा शिवजयंती जोरदार साजरी करण्याची शक्यता आहे. तशी तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यात दुसरीकडे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे घेऊन मुसंडी मारण्यासाठी तयारी केल्यामुळे मनसेकडूनही शिवजयंती जोरात साजरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील प्रमुख चौकाचौकात स्टेज उभारण्यात आले आहे.