कळवण : सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) घटस्थापना करून सुरूवात होत त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा विषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.फनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून भाविकांसाठी कालभैरव मंदिर समोरील मॅझेनिंग फ्लोअरच्या पूर्वेकडील रेलिंगच्या बाजूने परतीचा मार्ग आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरापासून परशुराम बालाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्ग जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार यंदाही बंद करण्यात आला आहे.६५ सीसीटीव्हींचा वॉचपहिल्या पायरीपासून भगवती मंदिरापर्यंत फोकस लाइटची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर, शिवालय तलाव, प्रसादालय, पहिली पायरी ते मंदिर, दवाखाना आदी ठिकाणी ६५ सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात येऊन वॉच ठेवण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरातील देवीच्या विधीचे दर्शन व्हावे यासाठी जागोजागी सीसीटीव्ही तर २० ठिकाणी डिजिटल फलक उभारण्यात येत आहेत. देवीभक्तांना स्नान करण्यासाठी शिवालय तलाव स्वच्छ करण्यात आला असून मार्गावर वीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. 200 तात्पुरते साफसफाई कामगार तेथे नेमण्यात आले आहेत.
आजपासून सप्तश्रृंगगडावर आदिमायेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:32 IST
सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) घटस्थापना करून सुरूवात होत त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा विषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
आजपासून सप्तश्रृंगगडावर आदिमायेचा जागर
ठळक मुद्देशारदीय नवरात्रोत्सव : खासगी वाहनांना बंदी, प्रदक्षिणा मार्ग यंदाही बंद