आज चित्र होणार स्पष्ट
By Admin | Updated: April 4, 2016 23:46 IST2016-04-04T23:45:48+5:302016-04-04T23:46:46+5:30
अर्ज माघारी : लासलगाव बाजार समिती निवडणूक

आज चित्र होणार स्पष्ट
लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवार (दि. ५) अंतिम दिवस असून, आज चित्र स्पष्ट होईल असे बोबले जात आहे. निवडणुकीत तिरंगी लढत अटळ आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत २७२ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. सोसायटी सर्व साधारण मतदारसंघात ९७ उमेदवारी अर्ज, सोसायटी महिला राखीव गटाकरीता २० उमेदवारी अर्ज, सोसायटी इतर मागास प्रवर्गाकरीता २१ उमेदवारी अर्ज, सोसायटी भटक्या विमुक्त जमातीकरीता १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण मतदारसंघात ४१ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती करीता १६, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटककरिता २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
व्यापारी मतदारसंघात २३, तर हमाल-मापारी मतदारसंघात १४ उमेदवारी अर्ज असे एकूण २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीच्या आठरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघाच्या आकरा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण ७ जागांसाठी, महिला राखीव दोन जागा, इतर मागासवर्गीय एक जागा, विमुक्त जाती/ भटक्या जमातीच्या एक जागा, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी अर्ज दाखल झाले असून, सर्वसाधारण दोन जागांसाठी, अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीकरिता एक जागा, आर्थिक दुर्बल घटकाकरीता एक जागा, व्यापारी मतदारसंघासाठी दोन जागा, तर हमाल-मापारी मतदारसंघाच्या एका जागेकरीता मतदान होणार आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामकाज पाहात आहे. परंतु ईडीच्या कारवाईत ते सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थित त्यांचे समर्थक नेमकी काय भूमिका घेतात, याची चर्चा आहे. (वार्ताहर)