आदिवासींचा आज निर्धार मोर्चा
By Admin | Updated: July 26, 2014 00:50 IST2014-07-26T00:36:49+5:302014-07-26T00:50:14+5:30
आदिवासींचा आज निर्धार मोर्चा

आदिवासींचा आज निर्धार मोर्चा
नाशिक : धनगर समाजाच्या आदिवासी समाजातील आरक्षणाच्या मागणीविरोधात शनिवार (दि. २६) सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.
गोल्फ क्लब येथून काढण्यात येणारा हा मोर्चा गडकरी चौक, आदिवासी विकास भवन, त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालिमार, प. सा. नाट्यगृह, एम.जी.रोड या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचेल. यासंदर्भातील प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, धनगर समाजाला आदिवासींच्या ४७ जमातींसाठीच्या सात टक्के आरक्षणामध्ये वाटेकरी केल्याने आदिवासींचे अस्तित्व व संस्कृती धोक्यात येण्याची भीती आहे. आदिवासींवर अन्याय होणार असल्यास आंदोलन उभे केले जाईल. या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. अशोक बागुल, किसन ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)