आज राष्ट्रीय लोकअदालत
By Admin | Updated: December 12, 2015 00:09 IST2015-12-12T00:08:38+5:302015-12-12T00:09:55+5:30
आज राष्ट्रीय लोकअदालत

आज राष्ट्रीय लोकअदालत
नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि़ १२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ या अदालतीपुढे २६ हजार ५०० दावे ठेवण्यात आल्याची माहिती सचिव वि़ ऱ अगरवाल यांनी दिली आहे़ राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात दावा दाखलपूर्व २० हजार तर न्यायालयात दाखल ६ हजार ५०० प्रकरणे ठेवली जाणार आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत उद्घाटन होणार आहे़
या लोकअदालतीत जास्तीत
जास्त दावे दाखल करण्याचे आवाहन सचिव अगरवाल यांनी केले
आहे़ (प्रतिनिधी)