्न्नराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा आजपासून
By Admin | Updated: November 21, 2014 00:06 IST2014-11-21T00:04:27+5:302014-11-21T00:06:33+5:30
्न्नराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा आजपासून

्न्नराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा आजपासून
नाशिक : इंडस्ट्रिज वेलफेअर सेंटर (निवेक) व राजस्थानी लेडीज सर्कल यांच्या वतीने राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे शुक्रवार (दि. २१) पासून आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार यांनी दिली़ शुक्रवारी (दि. २१) सकाळी सातपूर येथील निवेकच्या मैदानावर स्पर्धांना प्रारंभ होणार आहे़ १४ वर्षांआतील मुले व मुलींच्या गटात या स्पर्धा रंगणार आहेत़ स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना चषक व मानांकनाचे महत्त्वाचे गुण व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवेकचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, राजा जॉली, रमेश वैश्य, राजस्थानी सर्कलच्या अध्यक्ष वैशाली कारवा यांनी केले आहे़