शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:06 IST

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

ठळक मुद्देतीन हजार अर्ज दाखल : शेवटच्या दिवशी उडणार झुंबड

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी असल्याने अर्ज दाखल होण्याची संख्या कमी होती. कार्यालये सुरू होताच ८७३ अर्जांची आनलॉइन प्रीट आऊट इच्छुकांनी निवडणूक शाखेत जमा केली. मंगळवारी तीन हजारापर्यंत अर्जांची संख्या पोहोचली असून अखेरच्या दिवशी आणखी तीन हजार अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर वाढत असून पक्षीय राजकारणाच्या हालचालीदेखील गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यातही सरपंच, उपसरपंचदासाठी लिलावाद्वारे बोली लागत असल्याने साऱ्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे.दिंडारीतून ४८९, निफाडमधून ६१७, सिन्नरमधून ३३७, येवला येथून ४४५, मालेगावातून ६९९, नांदगाव २०३, चांदवड ३२४, कळवण १९७, बागलाण २८२, तर देवळा येथून २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.त्र्यंबकेश्वरमधून केवळ ११ अर्जजिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असताना त्र्यंबकेश्वरमधील तीन ग्रामपंचायतींसाठी अवघे ११ अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या सोमवारी तीन अर्ज दाखल झाले होते तर मंगळवारी ८ याप्रमाणे ११ अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल देवळा येथून २८ तर इगतपुरीतून ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक