आज बकरी ईद
By Admin | Updated: September 24, 2015 22:56 IST2015-09-24T22:55:11+5:302015-09-24T22:56:06+5:30
आज बकरी ईद

आज बकरी ईद
नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईद आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहाजहांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे.
नमाजपठणाचे नेतृत्व खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी हे करणार आहे. सकाळी दहा वाजता नमाजपठणाला प्रारंभ होणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. शहर परिसरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. चंद्रदर्शनानंतर बकरी ईद दहा दिवसांनी साजरी केली जाते. ‘जिलहिज्जा’ या उर्दू महिन्याचे चंद्रदर्शन एक दिवस उशिरा झाल्यामुळे गुरुवार ऐवजी आज (दि. २५) सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात आहे. ईदगाहच्या वास्तूला रंगरंगोटी करण्यात आली असून पूर्वसंध्येला संपूर्ण मैदान बॉम्बशोधक पथकाने पिंजून काढले. पोलिसांनी मैदानाचा ताबा घेतला असून दोन्ही प्रवेशद्वार संध्याकाळपासून बंद करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता मैदान नमाजपठणासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली आहे.
स्थलांतरितांना देणार १ अब्ज युरो
ब्रुसेल्स : स्थलांतरितांचा युरोपवर पडणाऱ्या बोजावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे बोलाविण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखेर सीरियन स्थलांतरितांसाठी १ अब्ज युरोची तरतूद करण्यात आली. ही मदत वर्ल्ड फुड प्रोग्रॅम आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थलांतरविषयक शाखेद्वारे करण्यात येणार आहे. सक्तीच्या कोटा पद्धतीने स्थलांतरितांना विभागण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मंगळवारपासून युरोपात तणावाचे वातावरण होते