आज तलाठी, लिपिक पदांसाठी परीक्षा
By Admin | Updated: October 3, 2015 22:58 IST2015-10-03T22:54:52+5:302015-10-03T22:58:06+5:30
आज तलाठी, लिपिक पदांसाठी परीक्षा

आज तलाठी, लिपिक पदांसाठी परीक्षा
नाशिक : जिल्हा प्रशासनात भरण्यात येणाऱ्या लिपिक व तलाठी या पदांसाठी रविवारी नाशकात दोन सत्रात परीक्षा घेण्यात येत असून, त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
सकाळी दहा ते बारा या वेळेत लिपिकांच्या २३ पदांसाठी ५३१८ उमेदवार असून, त्यांची १४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. तर तलाठ्यांच्या ४४ जागांसाठी १५ हजार ३६८ उमेदवार असून, दुपारी २ ते ४ या वेळेत ४० केंद्रांवर परीक्षा होईल.
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना यापूर्वीच हॉल तिकीट देण्यात आलेले आहे व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक, समावेक्षक अशा ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवारी या परीक्षेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)