आज मौसम भी पूरा दिन रोया हैं...!
By Admin | Updated: July 29, 2015 00:58 IST2015-07-29T00:58:31+5:302015-07-29T00:58:54+5:30
सोशल मीडियावर शोकसंदेश : नेटिझन्स हळहळले; कलाम यांच्या आठवणींना दिला उजाळा

आज मौसम भी पूरा दिन रोया हैं...!
नाशिक : ‘आज मौसम भी पूरा दिन रोया हैं,
मेरे देश ने कलाम खोया हैं...’
अशा प्रकारचे भावपूर्ण शोकसंदेश आज दिवसभर सोशल नेटवर्क साईटवर फिरत होते. भारताचे अकरावे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अर्थात अबुल पाकीर जैनुलआबेदिन अब्दुल कलाम यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या विविध पोस्ट शेअर केल्या. मंगळवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर केवळ आणि केवळ कलाम यांना भावपूर्ण श्रध्दांजलीचेच संदेश विविध स्वरूपामध्ये ‘पोस्ट’ के ले जात होते.
काहींनी कलामांचा अल्पसा परिचय, तर काहींनी कलामांचे दुर्मीळ प्रसंगाचे छायाचित्र व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केले तर काहींनी त्यांचे देश, विज्ञान व विद्यार्थ्यांवरील प्रेम अधोरेखित करणारे भावपूर्ण शोकसंदेशही टाकले. एकूणच सोशल मीडियावर मंगळवारचा दिवस हा कलामांना श्रध्दांजली देणारा ठरला. आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही आपल्या ग्रुपमध्ये मित्र-मैत्रिणींना शुभ सकाळपासून तर कोणत्याही शुभेच्छा देऊ नये, किंवा विनोद क रणेही टाळावे, त्याऐवजी सुविचार अथवा कलाम साहेबांच्या आठवणी जागविणारे पोस्ट अवश्य करावे, असे आवाहन बहुतांशी ग्रुप अॅडमिनकडून व्हॉट्सअॅपवर क रण्यात आले होते.
सोशल मीडियावर झळकलेले काही निवडक शोकसंदेश असे, ‘आम्ही भारतीय एवढे ग्रेट आहोत की, अब्दुल कलाम यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्यासुध्दा आत्म्याला शांती लाभो, अशी देवाकडे प्रार्थना करतो...’ ‘भारताचा अग्निकवच आज आपल्यातून निघून गेला, देशभक्ती, देशप्रेम आणि देशसेवा या कल्पनेचे अस्तित्व म्हणजे कलाम सर, कलाम तुम्हाला सलाम’ ‘अग्निपंखाचा शिल्पकार, खरा भारतरत्न हरपला....शतश: प्रणाम’ ‘डोन्ट डिक्लेअर हॉलिडे आॅन माय डेथ,, इनस्टेड वर्क अॅन एक्स्ट्रा डे, इफ यू लव्ह मी.’ - डॉ. अब्दुल कलाम. ‘ देख ले ओवेसी, आज पुरा देश एक सच्चे मुसलमान के लिये रो रहा हैं, बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की हैं...’
‘कलियुग की रामायणकार राम चला गया... मेरे देश का कलाम चला गया... जो देता था एकता का पैगाम वो कलाम चला गया... जिसने दिया देश को परमाणु वो कलाम चला गया... क्या बताऊ दोस्तो वतन का सबसे बडा हमनाम चला गया... हमारा कलाम चला गया... ‘जो कहते है हिंदू-मुस्लीम से नफरत करते है, उन्हे देखना चाहियें, आज सारा भारत एक सच्चे मुस्लीम के लिये आंसू बहा रहा हैं...’, ‘ अरे कोणी सांगा त्या अबू आजमी, माजिद मेमन, ओवेसी आणि सलमानला कलाम यांच्या जाण्याने सारा भारत हळहळतोय, ते त्यांच्या धर्मामुळे नाही तर त्यांच्या कर्मामुळेच.... कारण माणूस धर्माने नाही तर कर्माने ओळखला जातो.’ ‘आज मौसम भी पूरा दिन रोया हैं, मेरे देश ने कलाम खोया हैं...’