आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
By Admin | Updated: January 12, 2017 00:12 IST2017-01-12T00:11:53+5:302017-01-12T00:12:09+5:30
हरकती मागविल्या : २१ जानेवारीला अंतिम यादी

आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. १२) महापालिकेच्या संकेतस्थळासह सहाही विभागीय कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर दि. १२ ते १७ जानेवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर दि. २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाते. विधानसभेची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे दि. ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ तसेच १६ सप्टेंबर ते २१ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यासाठी नाशिक महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे मतदार नोंदणीसाठी व मतदार याद्यांतील दुरुस्त्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविली होती.