आज धनत्रयोदशी
By Admin | Updated: October 21, 2014 01:57 IST2014-10-21T01:20:06+5:302014-10-21T01:57:54+5:30
आज धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी
, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या धनत्रयोदशी!मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसेच धनाचीही पूजा केली जाते. आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आजच्या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यामुळे अपमृत्यू टळतो, अशी भावना आहे. धनत्रयोदशीबद्दल दंतकथा सांगितली जाते, ती म्हणजे इंद्रदेवाने महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी असुरांबरोबर जे समुद्रमंथन केले, त्यातून देवलक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही पूजा केली जाते. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात व प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर वांटतात. दिवाळीत सगळेच जण नवीन वस्तू खरेदी करतात, व्यापारीवर्गही त्याला अपवाद नाही. या दिवशी दुपारी ३.१८ ते ४.४५ या वेळेत व्यापारी वही खरेदी करणे शुभ आहे.