सिन्नर येथे आजपासून ६६ सायकलिस्ट ‘पंढरपूरच्या वारी’ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:52 IST2019-06-27T18:52:18+5:302019-06-27T18:52:49+5:30
सिन्नर : सिन्नर सायलिस्ट ग्रुपचे ६६ सदस्य शुक्रवारपासून पंढरपूरच्या वारीला रवाना होत असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामभाऊ लोणारे यांनी दिली. सिन्नरकरांच्या सायकल वारीचे हे पाचवे वर्ष असून नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या या सायकल वारीत सिन्नरकर सहभागी होत आहेत.

सिन्नर येथे आजपासून ६६ सायकलिस्ट ‘पंढरपूरच्या वारी’ ला
वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल यांनी सायकलवर पंढरपूर वारीची परंपरा सुरू केली. सायकलवारीचा पहिला मुक्काम नगरला तर दुसरा मुक्काम टेंभुर्णीला असणार आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेदरम्यान सायकलिस्ट पंढरपूर येथे पोहचणार आहेत. पंढरपूर सायकल वारीनिमित्त सिन्नरकरांनी सिन्नर सायकलिस्ट नावाने ग्रुप स्थापन केला असून ग्रुपची सदस्य संख्या ७३ पर्यंत पोहचली आहे. रोज ४० ते ५० किमी अंतर सायकल चालविताना सायकलचे महत्वही नागरिकांना पटवून देण्याचे काम ग्रुपचे सदस्य करतात. वृक्ष संवर्धनासारखे कार्यक्रम गु्रपच्या माध्यमातून राबविण्यात येतात अशी माहिती ग्रुपचे प्रवक्ता सुभाष कुंभार यांनी दिली. वारीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून मुकेश चव्हाणके धुरा सांभाळत असून या सायकल स्वारीत समाधान गायकवाड, संदीप ठोक, अनिल कवडे, संजय काळे, जयेश नाईक, वेदिका गायकवाड, लता चव्हाणके, लता चव्हाण, ज्योती निºहाळी, निशा गायकवाड, दिलीप लहामगे, पुंडलिक झगडे, शिवाजी लोंढे, महेंद्र कानडी, उत्तम आंधळे, आदींसह सदस्य सहभागी झाले आहेत.