एनडीएसटी संघटना अध्यक्षपदी टी.एम.डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST2021-03-07T04:14:38+5:302021-03-07T04:14:38+5:30

नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्षपदी टी.एम. डोंगरे तर कार्यवाहपदी चंद्रकांत कुशारे यांची निवड झाली आहे. डोंगरे वसतिगृह ...

TM Dongre as the President of NDST Association | एनडीएसटी संघटना अध्यक्षपदी टी.एम.डोंगरे

एनडीएसटी संघटना अध्यक्षपदी टी.एम.डोंगरे

नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्षपदी टी.एम. डोंगरे तर कार्यवाहपदी चंद्रकांत कुशारे यांची निवड झाली आहे. डोंगरे वसतिगृह येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब देवरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.६) ही निवड झाली.

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम एक वर्षापूर्वी जाहीर झाला होता. त्यानुसार, तालुका कार्यकारिणीच्या निवडणुकाही झाल्या होत्या. मात्र, पुढे कोरोनाच्या कारणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने संघाचे कामकाजात काही अंशी शिथिलता आली होती. अखेर सर्वानुमते कोरोनाचे नियम पाळून बैठक घेण्यात आली. यावेळी टी.एम.डोंगरे, मोहन चकोर, आर.डी.निकम, प्रदीप सांगळे, संजय गीते, अशोक कदम, जिभाऊ शिंदे, नीलेश ठाकुर, बी.के.सानप आदी उपस्थित होते.

संघटनेची नूतन कार्यकारणीत अध्यक्ष-टी.एम.डोंगरे, कार्याध्यक्ष-प्रदीप सांगळे, उपाध्यक्ष-किशोर जाधव, अनिल अहिरे, कार्यवाह-चंद्रकांत कुशारे, सहकार्यवाह-जिभाऊ शिंदे, दिनेश देवरे, खजिनदार-अशोक भदाणे.

===Photopath===

060321\06nsk_43_06032021_13.jpg

===Caption===

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे नूतन अध्यक्ष टी.एम. डोंगरे.मसवेत प्रदिप सांगळे, किशोर जाधव, अनिल अहिरे, चंद्रकांत कुशारे, जिभाऊ शिंदे, दिनेश देवरे, अशोक भदाणे

Web Title: TM Dongre as the President of NDST Association