तिसगाव चार दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 17:09 IST2020-09-06T17:08:53+5:302020-09-06T17:09:39+5:30
दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत.

तिसगाव चार दिवसांपासून अंधारात
दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत.
तिसगाव हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव असून पूर्ण गावासाठी एकच ट्रान्सफार्मर आहे. हा ट्रान्सफार्मर सदोदित नादुरु स्त असतो. कारण एवढ्या लोकसंख्येला तीन ट्रान्सफार्मरची आवश्यकता असताना एकच ट्रान्सफार्मरवर लोड येतो. त्यामुळे नागरिकांना सतत अंधाराचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत मार्फत वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन दिले पण वीज वितरण कंपनीकडून प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चार दिवसापासून ग्रामस्थ पूर्ण अंधारात आहेत. ग्रामपंचायतीने वणी, दिंडोरी, नाशिक येथील विजवितरणाच्या कार्यालयात निवेदन दिले. पण अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर त्वरीत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा सिरपंच हिराबाई ढगे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वणीच्या वितरण विभागाच्या अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपर्कहोऊ शकला नाही. तर ग्रामस्थांनीही संबंधित अधिकार्यांना फोन केल्यास ते उचलत नसल्याची तक्र ार केली आहे.