पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन मुलींचा खून केला अन् टेरेसवरून उडी घेत स्वतःला संपविले
By अझहर शेख | Updated: May 8, 2024 14:00 IST2024-05-08T13:59:43+5:302024-05-08T14:00:21+5:30
कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले.

पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन मुलींचा खून केला अन् टेरेसवरून उडी घेत स्वतःला संपविले
संदीप झिरवाळ, पंचवटी : आडगाव शिवारातील कोणार्क नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहानग्या मुलींना काहीतरी विष देऊन तसेच गळा आवळून खून करत स्वतः इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.8) सकाळी घडली. या घटनेत तिघा मायलेकींचा मृत्यू झाला. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०,रा.कोणार्कनगर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
बुधवारी सकाळी निकुंभ या महिलेने कौटुंबिक कारणावरून सकाळी 2 व 7 वर्षांच्या मुलींना जिवे मारले आणि त्यानंतर स्वतः टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. सदर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात पती व सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आडगाव पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.
ताऊ आणि माऊ असे खून झालेल्या 2 व 7 वर्षीय मुलींचे नाव आहे.
कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले.