टायर जाळपोळीच्या घटना : नागरिकांमध्ये घबराट
By Admin | Updated: October 10, 2016 02:02 IST2016-10-10T01:59:37+5:302016-10-10T02:02:03+5:30
सिडको-अंबडमध्ये बाजारपेठा बंद

टायर जाळपोळीच्या घटना : नागरिकांमध्ये घबराट
सिडको : अंबड तसेच विल्होळी येथे तळेगाव प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी टायर जाळपोळ करण्याबरोबरच रास्ता रोको आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रकरणी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी दुकाने आज दिवसभर बंद होती.
तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अतिप्रसंगाचे शनिवार मध्यरात्रीपासूनच ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले. शनिवारी सायंकाळनंतर या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. पाथर्डीफाटा येथे शनिवारी जमावाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याठिकाणी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले व आंदोलन करताना शांतता राखण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु जमाव हा वाढतच असल्याने मध्यरात्रीच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले होते. रविवारी सकाळी विल्होळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते. गावकऱ्यांनीही रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदविला. तसेच राजूर बहुला येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता राको आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वाहने जाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आज दिवसभर सिडकोतील त्रिमूर्तीचौक, रायगड, अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉर्इंट, अंबड येथेही टायर जाळपोळ करण्यात आले. (वार्ताहर)