‘टिप्पर’च्या म्होरक्याकडून कैद्याला मारहाण
By Admin | Updated: July 24, 2014 00:56 IST2014-07-24T00:03:38+5:302014-07-24T00:56:26+5:30
‘टिप्पर’च्या म्होरक्याकडून कैद्याला मारहाण

‘टिप्पर’च्या म्होरक्याकडून कैद्याला मारहाण
नाशिकरोड : मोक्काअंतर्गत कारागृहात असलेला टिप्पर गॅँगचा म्होरक्या समीर पठाण याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांनी एका कैद्यावर तीक्ष्ण हत्त्याराने वार करीत त्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पठाण याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, या प्रकारांना अद्यापही आळा बसलेला नाही. मध्यवर्ती कारागृहातील कैदी सादीक सलीम मेमन (वय २३), रा. भद्रकाली हा मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कारागृहातील मंडल विभाग ७ मधील यार्ड क्र. १ मधील बॅरेक क्रमांक १ मध्ये बसलेला असताना, एका कैद्याने बॅरेक क्रमांक ४ मध्ये बोलावले असल्याचा निरोप दिला. त्यानुसार मेमन हा बॅरेक ४ मध्ये गेला असता, जावेद पठाणला का मारले, अशी कुरापत काढून समीर पठाण व त्याचे साथीदार बाळू भीमराव डोके, विजय नंदलाल रहांगळे, सुनील राजाराम शेलार, सोमनाथ भिकाजी कदम, संदीप गोपीचंद दोंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे मेमन याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाण करणाऱ्यांपैकी कुणीतरी तीक्ष्ण हत्त्याराने डाव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)