आमच्यावर परत संघर्षाची वेळ
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-11T23:54:45+5:302014-07-12T00:24:32+5:30
आमच्यावर परत संघर्षाची वेळ

आमच्यावर परत संघर्षाची वेळ
सिन्नर : नियतीने आमच्यावर परत संघर्षाची वेळ आणली असली तरी सिन्नरकरांसह राज्यभरातून मिळणाऱ्या प्रेमाच्या वर्षावामुळे नव्या उमेदीने उभे राहण्याची ताकद मिळाली असल्याची भावना आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केली.
नाशिक येथे कोअर कमेटीची बैठक आटोपून पुण्याकडे जात असतांना त्या उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.
पक्ष व जनतेकडून मुंडे कुटुंबातील व्यक्तीनेच लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह केला जात आहे. लोकसभा की विधानसभा याबाबत मी संभ्रमात असल्याचे त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुढेही राज्यात युतीचा संसार प्रेमानीच चालवा अशी आपली इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या. उदय सांगळे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)