शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:02 IST

कवडदरा : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान न दिल्याने शाळा-महाविद्यालयातअनेक शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत आहे.

ठळक मुद्देआर्थिक शोषण : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही

कवडदरा : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान न दिल्याने शाळा-महाविद्यालयातअनेक शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत आहे.शासनाने कायम शब्द काढून दहा वर्षे झाली. अनुदान मंजुरीचा विषय गेल्या सात वर्षांपासून सुरू असून, गेली दहा-पंधरा वर्षे विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. शासनाने १३ सप्टेंबर २०११ रोजी २० टक्के व ४० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढला. या निर्णयाची आजअखेर प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. शिक्षक वेतन कधी सुरू होईल याच्या प्रतीक्षेत आहे. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.विनाअनुदानित शिक्षकांकडून संस्थाचालक कोणत्याही प्रकारचे मानधन न देता काम करून घेत आहेत. काही बिनपगारी शिक्षकांनी खासगी शिकवणी चालू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला होता. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने या शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांनी सुरू केलेले इतर व्यवसायही थंडावले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आॅनलाइन वर्ग घेण्याची धडपड करताना शिक्षकांसमोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल विनाअनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी आहे. याबाबत शासनाने लक्ष देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील शिक्षक नेते रवि निसरड यांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक