पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:41 PM2020-01-08T22:41:11+5:302020-01-08T22:41:38+5:30

येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.

Time to sell onion seedlings due to water scarcity | पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

Next
ठळक मुद्देचिंता : जलस्रोतांनी तळ गाठल्याने पिके करपू लागली

राजापूर : येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.
राजापूर येथे विहिरीचे पाणी कमी पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट उभे राहण्याचे चिन्ह गडद झाले आहे. यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी मका, कांदा, गहू, हरभरा पिके केली, मात्र जलस्रोत अचानक आटल्याने तसेच एकाएकी विहिरी उपसायला लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. गहू, रांगडा कांदा सध्या शेतात आहे, परंतु सध्या विहिरी आटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे.
गव्हासाठी तीन ते चार ते वेळेस पाणी भरण्याची गरज आहे, परंतु सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा रोपे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाण्याअभावी पीक जगविणे अवघड झाले आहे. उन्हाळ कांद्याच्या रोपाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी वर्ग कांद्याऐवजी आता रोपे विक्र ी करीत आहेत. यामुळे राजापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. तर इतर तालुक्यात उन्हाळ कांद्याचे रोप मिळत नसल्याने बाहेरचे तालुक्यातील शेतकरी दररोज राजापूर व परिसरात रोपांसाठी फिरत आहेत. अव्वाच्या सव्वा किमती देत रोपे घेऊन लागवडीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे राजापूर येथील शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची रोपे विक्र ीला जोर दिला आहे.

पिके वाचविण्यासाठी धडपड
यावर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असतानाही कांदा पीक घेणे अवघड झाले असल्याने महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती, तर यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी खरीप व रब्बीच्या पिकांची पेरणी केली, परंतु किती पाऊस झाला तरी राजापूर व परिसरात पुन्हा पाणीटंचाई सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Time to sell onion seedlings due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.