पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

By Admin | Updated: July 17, 2014 00:53 IST2014-07-16T22:54:34+5:302014-07-17T00:53:11+5:30

पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

The time to sell animals to the livestock | पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

पिळकोस : समाधानकारक पाऊस नसल्याने कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरातील पशुपालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. हाती असलेला चारा संपल्याने काही पशुपालकांना आपली पाळीव जनावरे विकून स्थलांतरीत व्हावे लागले आहे .
‘गरिबांची गाय’ म्हटल्या जाणाऱ्या शेळीलाही आज रानात चारा नसल्यामुळे वणवण भटकंती करावी लागत असल्याचे मेंढपाळांनी सांगितले. त्यामुळे गावात शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या आदिवासीबांधवांना आपल्या शेळ्या, बोकड विकण्याची पाळी आली आहे. काठेवाडी बांधवांकडील जनावरांना दररोज मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. परंतु साठ्यातील चारा संपल्याने जंगलातील काडीकचराही शिल्लक नसल्याने पशुपालकांची जनावरे चाऱ्यासाठी रानोमाळ हिंडूनही पोटाला चारा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही पशुपालकांना आपली पाळीव जनावरे विकावीही लागत असल्याचे चित्र आहे. मेंढपाळांचे पावसासाठी आकाशाकडे लक्ष लागले आहे. शेतकरी, पशुपालक पावसासाठी नवस बोलू लागले आहेत. कुठेच पावसाचे चिन्ह दिसत नसल्यामुळे पशुधन विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: The time to sell animals to the livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.