शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

नगरसेवकांचे अनुसरण आमदारांना करण्याची वेळ ...

By किरण अग्रवाल | Updated: April 18, 2021 00:15 IST

राजकारण्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागत असते. आता कोरोनाकाळातही ते दिसत नसल्याची टीका होत आहे; पण यातही संवेदनशीलता जपून कामाला लागलेल्यांचा अपवाद पुढे येऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळून गेला आहे.

ठळक मुद्देसंकटाशी निपटण्यासाठी लोकसहभागाची आश्वासक सुचिन्हेलोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात कुठे परागंदानियतीचा खाते उतारा भरला जातो आहे ...

सारांशविकासाच्या नावाने शिमगा करीत राजकारण करणारे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात कुठे परागंदा झालेत, असा प्रश्न उपस्थित होऊ पाहत असताना काही जणांकडून संवेदनशीलतेचा परिचय देत नागरिकांच्या काळजीचे प्रयत्न सुरू झालेत, ही मोठी समाधानाची व दिलासादायक बाब म्हणायला हवी. शासन व प्रशासनाने यासंदर्भात चालविलेल्या प्रयत्नांच्या जोडीला असा लोकसहभाग वाढून गेला तर संकटावर मात करणे सुकर ठरेल.कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी शासन व प्रशासन झटत आहेच. पण त्यात लोकसहभाग मिळण्याचीही अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नाशकातील काही आमदार, नगरसेवक व संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सिडकोतील नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑक्सिजन व्यवस्थायुक्त कोविड सेंटर उभारले आहे, तर गंगापूरमधील विलास शिंदे यांच्या प्रयत्नातून परिसरातील खासगी डॉक्टरांनी गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली दोन- दोन तास सेवा देणे सुरू केले आहे. व्यवस्था असली तरी प्रशिक्षित मनुष्यबळ कुठून आणणार, असा प्रश्न त्यामुळे निकाली निघाला असून, लोकसहभागाचे हे उदाहरण इतरांसाठीही अनुकरणीय ठरावे. येथे दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था तेथील शिवसेनेने आपल्या हाती घेतली आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनीही रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजनची व्यवस्था करता येणारी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.महत्त्वाचे म्हणजे काही नगरसेवकांनी आपला नगरसेवक निधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यासाठी वापरा म्हणून आयुक्तांना पत्र दिले असून, लवकरच त्यातून सदर उपकरणे घेऊन वॉर्डा-वॉर्डांत ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन विधायक समाजकारण करण्याची असून, तेच या काही मोजक्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व मेट भुजबळ नॉलेज सिटीने संयुक्तपणे ऑक्सिजन बेड्सचे, तर जितोसारख्या सामाजिक संघटनेनेही कोरोना सेंटर उभारले असून, इतरही काही संस्था वैद्यकीय सुविधांसाठी पुढे सरसावल्या आहेत.पालकमंत्री छगन भुजबळ सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था उभारण्यावर भर देत आहेत, तर मालेगावी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून एचआरसीटी चाचणीच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे आपल्या निधीचा उपयोग या संबंधीच्या उपायांसाठी करणार आहेत. कोरोनाशी लढण्याची ताकद देणारा तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये उमेद जागवणाराच हा सहभाग म्हणायला हवा.साहित्य संमेलनाच्या उत्सवी उरुसासाठी दहा- दहा लाखांचा निधी घोषित करणाऱ्या जिल्ह्यातील अन्य आमदार व खासदारांनीही या संकटसमयी पुढे येऊन अशी दिलदारी दाखविली तर आज आपल्याला उपचारच मिळतील की नाही याबाबत जे भयाचे वातावरण लोकांमध्ये दाटले आहे ते तरी दूर होण्यास निश्चितच मदत होईल. विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल. कोरोनाचे संकट हे सर्वांवरचे संकट आहे. प्रत्येकालाच स्वतःच्या जिवाची काळजी आहे; पण म्हणून किमान लोकसेवेत असणाऱ्यांनी तोंड लपवून अगर परागंदा राहून चालणारे नसते, तर अशावेळी खऱ्या अर्थाने सेवेसाठी झोकून द्यायचे असते. या सेवेची गुंतवणूक हीच त्यांच्यासाठी भविष्यात फायद्याची ठरू शकेल, तेव्हा संबंधितांनी तसेच इटिंग व मिटिंगममध्ये व्यस्त राहणाऱ्या संस्थांनीही पुढे येणे अपेक्षित आहे.नियतीचा खाते उतारा भरला जातो आहे ...एकीकडे डॉक्टर्स, नर्सेस आदिंचा कोरोनाच्या संकटाशी निकराने अहोरात्र मुकाबला सुरू असताना दुसरीकडे काही अन्य घटक मात्र अडवणूक करून संधी साधू पाहत असल्याच्या तक्रारी ऐकू येत आहेत. गरजेपोटी नाइलाजातून अधिकृत तक्रारी कुणी करत नसले तरी नियतीचा खाते उतारा बारकाईने भरला जातो आहे, हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे. या उताऱ्यात संवेदना, सहकार्याच्या नोंदी कशा वाढविता येतील हेच बघायला हवे. वैद्यकीय सेवार्थींना पाठबळ पुरविण्याचीच भूमिका घेतली जायला हवी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणMLAआमदारCorruptionभ्रष्टाचारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा