शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मतदारांची मज्जाच मज्जा!

By श्याम बागुल | Updated: March 20, 2019 01:40 IST

एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदान अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देलहान बालकांना सांभाळणार : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मंडपाची सोय

नाशिक : एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदान अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच आपल्या तान्हुल्यासह येणाºया महिला मतदारांचे बाळ संगोपणासाठी स्वयंसेवक नेमण्याचे तसेच मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये म्हणून केंद्राच्या आवारात मंडप उभारण्यासह ११ प्रकारच्या सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.आयोगाच्या सूचनांमध्ये प्रामुख्याने दिव्यांग मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प उभारण्यात आले आहेत. अशा मतदारांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदारांच्या रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून त्यांची स्वतंत्र रांग तयार करून प्राधान्याने त्यांनाच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर किमान तीनशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवण्यात यावी, पाणी पिण्यासाठी ग्लासही ठेवावा असे आवर्जून सांगण्यात आले आहे. त्याठिकाणी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी व या व्यक्तीने पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी तसेच रांगा लागल्यास रांगेत असलेल्या मतदारांना पाणी वाटप करण्यात यावे. मदत कक्षामार्फत मतदारांना मतदानाच्या चिठ्यांचे वाटप केले जाईल. मतदान केंद्राच्या आवारात पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले असून, त्यातही जर एकच स्वच्छतागृह असेल तर ते महिलांसाठी राखीव ठेवावे व त्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचाºयाची नेमणूक करण्याच्या सूचना आहेत. पुरुषांसाठी जर स्वच्छतागृह नसेल तर तात्पुरते स्वरूपात ते उभारण्यात यावे जेणे करून अडचण निर्माण होणार नाही. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरातून मतदानासाठी आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात येणार आहे.या शिवाय मतदान केंद्रात विजेची व्यवस्था, वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराचे आरोग्य कीट ठेवण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.च्मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे याची माहिती होण्यासाठी मतदान केंद्रानजीक दिशादर्शक फलक लावण्यात यावे, त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आवारात स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, मदत कक्ष कोठे आहे याची नकाशाद्वारे माहिती देणारे फलक लावण्यात यावे.मतदानासाठीदेखील एक पुरुषाने केंद्रात जाऊन मतदान केल्यानंतर दोन महिला मतदान करतील म्हणजेच महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, ज्या महिला बाळासह येतील त्यांच्या बाळाचे संगोपण करण्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्वयंसेवकाला मात्र बालक हाताळण्याचा अनुभव असायला हवा, असे आयोगाने दिलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.च्प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मदत कक्ष निर्माण करण्याच्या व त्याची जागादेखील दर्शनी भागात ठेवण्यात यावी. या ठिकाणी त्या त्या मतदान केंद्रातील बीएलओ बसतील त्यांच्यामार्फत प्रत्येक मतदाराला त्याचे नाव व मतदान केंद्र शोधून देण्याचे काम सोपविण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक