शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच ठार : साखरपुड्याला गेलेल्या बोहरी कुटुंबावर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:13 IST

नाशिक : टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीजवळ राहणारे रामपुरावाला बोहरी कुटुंब आपल्या दोन मुलांच्या साखरपुड्यासाठी नागपूर येथे आठवडाभरापुर्वी होंडासिटी कारने ...

ठळक मुद्देनवरदेवासह त्याची आई, मित्र व दोन चिमुकले मृत्यूमुखीकारचा संपूर्ण चक्काचूर झाला

नाशिक : टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीजवळ राहणारे रामपुरावाला बोहरी कुटुंब आपल्या दोन मुलांच्या साखरपुड्यासाठी नागपूर येथे आठवडाभरापुर्वी होंडासिटी कारने रवाना झाले होते. साखरपुडा आटोपून परतीचा प्रवास करत असताना मुर्तीजापूरजवळ राज्य महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात एकूण पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये नवरदेवासह त्याची आई, मित्र आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. नवरदेवाचे वडील आणि एक सहप्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, द्वारकाजवळील कुतुबी मशिदीसमोरील अपार्टमेंटमध्ये राहणारे गुलामहुसेन रामपुरावाला हे त्यांचा मुलगा हुसेन व हाशिम यांच्या साखरपुड्यासाठी आपली पत्नी फातेमा व हुसेनचा मित्र बुरहानुद्दीन दिलावर यांच्यासह होंडासिटी कारने (एम.एच०४ बी डब्ल्यू ५२५९) गेल्या सोमवारी (दि.१३) शहरातून नागपूरकडे रवाना झाले. दरम्यान, रामपुरावाला यांचा मोठा मुलगा हाशीम हा मस्कदमध्ये नोकरीला असल्याने तो थेट नागपूरला आला होता. दोन्ही मुलांचा साखरपुडा आटोपल्यानंतर सोमवारी (दि.२०) रामपुरावाला हे त्यांच्या कुटुंबासह मुंब्रा येथे राहणाऱ्या ओळखीच्या झाबिया हुसेन हबीब या महिलेला व तीच्या चार महिन्याच्या चिमुकली व चार वर्षाच्या मुलाला घेऊन नाशिककडे येण्यासाठी निघाले. दरम्यान, निम्म्यापेक्षा अधिक प्रवास पुर्ण झाला असताना मुर्तुजापूरजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर दुपारच्या सुमारास धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आणि विविध भाग सर्वत्र विखुरले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व तीन रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तत्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. या अपघातात गुलामहुसेन व झाबीया हबीब हे दोघे सुदैवाने बचावले असून ते गंभीर जखमी आहेत.

...यांचा झाला मृत्यूफातेमा गुलामहुसेन रामपुरावाला (४५), हुसेन गुलामहुसेन रामपुरावाला (२६), बुरहानुद्दीन मुस्तुफा दिलावर (२४, सर्व राहणार, द्वारका, नाशिक), बुरहानुद्दीन हबीब (४ वर्षे, रा.मुंब्रा), तसनीम हबीब (४ महिने, रा.मुंब्रा) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिलावर याच्या मृतदेहावर जुने नाशिकमधील बोहरा कब्रस्तानात मंगळवारी दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग