आडगावला सोनसाखळी लांबविली
By Admin | Updated: November 7, 2015 22:17 IST2015-11-07T22:15:18+5:302015-11-07T22:17:01+5:30
आडगावला सोनसाखळी लांबविली

आडगावला सोनसाखळी लांबविली
पंचवटी : पाण्याची बाटली खरेदी करण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाची सोनसाखळी पळवून नेल्याची घटना शुक्रवारी पंचकृष्ण लॉन्स येथील चंद्रबळनगरात घडली आहे. या घटनेबाबत अर्चना संजय पेंढारे यांनी आडगाव पोलिसांत सोनसाखळी चोरीची तक्रार दिली आहे.
पेंढारे यांचे सम्राट चंद्रगुप्त हौसिंग सोसायटीत आदित्य जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून, काल सकाळी साडेदहा वाजता पेंढारे या दुकानात वर्षा यादव नामक ओळखीच्या महिलेशी बोलत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका भामट्याने दुकानात येऊन पाण्याची बाटली खरेदी केली. त्यानंतर दुकानातील काजू मागितले. पेंढारे यांनी काजू दिल्यानंतर पैसे घेत असताना त्या भामट्याने पेंढारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली, तर दुसऱ्याने दुचाकी सुरू करून पळ काढला. सदर घटनेनंतर दोघा महिलांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत चोरटे वेगाने वाहन घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.